Diego Maradona Passes Away: महान फुटबॉलर ‘डिएगो मॅराडोना’चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

एमपीसी न्यूज : जगभरातील सर्व फुटबॉल चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे. अर्जेंटिनाचा महान फुटबॉल आयकॉन आणि फिफा वर्ल्ड कपचा माजी विजेता डिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांचे बुधवारी निधन झाले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीच्या काळात मेंदूतून रक्ताची गुठळी काढण्यासाठी मॅरेडोनावर शस्त्रक्रिया झाली होती. मॅराडोना यांना दोन आठवड्यांपूर्वी Buenos Aires मधील क्लिनिकमधून डिस्चार्ज मिळाला होता. मॅरेडोनाला आतापर्यंतचा एक महान फुटबॉलपटू म्हणून ओळखले जाते. त्यांची एकूण कारकीर्द एकूण 21 वर्षांची होती. 1986 च्या विश्वचषकात अर्जेंटिनाला त्यांनी मोठा विजय मिळवून दिला होता, जो आजही आठवला जातो.

_MPC_DIR_MPU_II

मॅराडोनाच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, माजी अर्जेन्टियन कर्णधार यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. माजी एफसी बार्सिलोना (FC Barcelona) आणि नापोली स्टेलवार्ट (Napoli stalwart) मॅराडोना गेल्या काही महिन्यापासून आरोग्याच्या समस्येशी झुंज देत होते. काही महिन्यापूर्वी त्यांची सबड्युरल हेमॅटोमासाठी शस्त्रक्रियाही झाली होती. 30 ऑक्टोबर रोजी मॅराडोना यांनी आपला 60 वा वाढदिवस साजरा केला. ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आहारी गेलेल्या मॅराडोनाला उच्च जोखमीचा रुग्ण म्हणून पाहिले जात होते.

1976 मध्ये मॅराडोनाने फुटबॉलच्या जगात प्रवेश केला. मॅरेडोनाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बोका ज्युनियरकडे जाण्यापूर्वी अर्जेंटिनास ज्युनियर्स येथे केली होती, जिथे त्यांना बार्सिलोनाने आपल्या टीममध्ये घेतले. या दरम्यान त्यांच्या उत्कृष्ट कौशल्याबद्दल जगभरातील कोट्यावधी लोकांकडून त्याचे कौतुक झाले.

1982 च्या फुटबॉल विश्वचषकात मॅराडोनाची प्रथम चर्चा झाली. हा विश्वचषक स्पेनमध्ये खेळला गेला होता पण त्यावेळी फक्त 21 वर्षीय मॅराडोना अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू म्हणून उदयास आला होता. मॅरेडोनने अर्जेटिनाकडून 91 सामन्यांत 34 गोल केले आणि चार वर्ल्ड कपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी बरीच उल्लेखनीय कामगिरी व सर्वोत्कृष्ट गोल केले, ज्याची उदाहरणे पुढच्या पिढीला दिली जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like