Pune Mumbai Expressway : पुणे- मुंबई एक्स्प्रेस वेवर डिझेल टँकरला आग

एमपीसी न्यूज –  पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर बोरघाटात डिझेल टँकरला आज पहाटे सहाच्या सुमरात आग लागली. या आगीत MH.46. AR. 3166 ह्या गाडीची केबीन पूर्ण पणे जाळून खाक झाले आहे. आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महामार्ग पोलीस-बोरघाट यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आग देवदूत यंत्रणा व खोपोली अग्निशमन दल यांनी विझवली. सदर घटनेत कोणीही जखमी नसून रोडचे काहीही नूकसान नाही. वाहतूक काही वेळात सुरळीत करण्यात अली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.