-MPC-TOP-MOST-BANNER-I

Daund Crime News : डिझेल चोरी करणारी अट्टल टोळी दौंड तालुक्यात जेरबंद 

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी..

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – दौंड आणि हवेली तालुक्यात डिझेल चोरी करणारी अट्टल टोळी दौंड तालुक्यातील यवत येथे जेरबंद केली आहे. दोन चारचाकी वाहनासह 4 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल या पथकाने यावेळी जप्त केला आहे. ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. 

दत्ता विनोद रणधीर ( वय 22), राहुल उर्फ दगड्या मारुती मदने ( वय 27 ), वैभव राजाराम तरंगे ( वय 19 ), प्रतीक बन्सीलाल तांबे ( वय 26, चौघे रा. दत्तवाडी, उरुळी कांचन ), स्वरूप विजय रायकर ( वय 23, रा. सूर्यवंशी मळा, अष्टापुर फाटा, ता.हवेली ) व धर्मेंद्र कुंडलिक टिळेकर (वय 34, रा. टिळेकर वाडी, ता. हवेली ) असे या डिझेल चोरांची नावे आहेत.

याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 9 जून रोजी  यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्रीत नांदूर येथील एका कंपनी समोरच्या पार्किंगमधून डिझेल चोरीला गेल्याची घटना घडली होती. 5 ट्रक मधून सुमारे 83 हजारचे डिझेल चोरीला गेल्याचे समोर आले होते. तसेच 11 जूनला पारगाव येथील एका ट्रक मधूनही 25 हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरीस गेले होते. हे दोन्ही गुन्हे यवत पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आले होते.

सदर गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरु केला. कोणताही पुरावा मिळत नसल्याने गोपनीय खबऱ्यामार्फ़त उरुळी कांचन परिसरातील काही संशयित इसमांची नावे समोर आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर माहितीची खात्री करून उरुळी कांचन परिसरातील दत्तवाडी या ठिकाणी गेले. त्यानंतर सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनी कार घेऊन रात्रीच्या डिझेल चोरल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 4 लाख 80 हजारांच्या दोन कार, 10 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 4 लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी आणि मुद्देमाल पुढील तपासासाठी यवत पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.