Pune News – डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा म्होरक्या जेरबंद, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – रस्त्यावर थांबलेल्या वाहनांमधून डिझेल चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा म्होरक्या यवत पोलीसांनी जेरबंद केला. त्याच्याकडून 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्यावर यवत पोलीस ठाण्यातील दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. 

राजवीर गजराजसिंग मल्होत्रा,( वय 36, सध्या रा. गावडेवाडी केसनंद ता. हवेली, जि पुणे. मुळ रा.दिल्ली ) असे या डिझेल चोरीच्या टोळीतील म्होरक्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेली तालुक्यातील केसनंद येथे डिझेल चोर राजवीर मल्होत्रा येणार असल्याची गोपनीय बातमी

यवत पोलीसांना मिळाली. त्यानुसार यवत पोलीसांनी त्यास सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक हजार लिटर डिझेल, एक जीप , एक टेम्पो,असा एकुण किंमत 14 लाखांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.