Dighi : उसने पैसे परत करण्याच्या कारणावरून दोघांचे अपहरण

एमपीसी न्यूज -उसने पैसे परत करण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात दोन तरुणाचे अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 14) आळंदी रोड, दिघी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

सुरेंद्र उत्तम वाघ (वय 34, रा. मल्हार हाईट्‌स, देवाची आळंदी, ता. हवेली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लोकेश कुळे आणि तीन अनोळखी व्यक्‍ती (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी सुरेंद्र आणि त्यांचा मित्र किरण शिंदे हे दोघेजण श्रेयस हॉटेल, आळंदी रोड, दिघी येथे 14 जानेवारी रोजी आठ वाजताच्या सुमारास उभे होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी लोकेश आणि त्याच्या साथीदारांनी वाघ तसेच शिंदे यांना उसने पैसे परत करण्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसून त्यांचे अपहरण केले. त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक तांबोळी पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.