Dighi : पाठलाग करून विनयभंग केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दोन वेगवेगळ्या घटनेत (Dighi) एका अल्पवयीन मुलीचा व एका तरुणीचा पाठलाग करून विनयभंग केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी व भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत 12 वर्षीय मुलीचा जानेवारी ते 11 फेब्रुवारी या 15 ते 20 दिवसांच्या कालावधीत पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या, पीडितेवर नजर ठेवणाऱ्या प्रदिप रघूनाथ चव्हाण (वय 60, रा.दिघी) या ज्येष्ठ नागरिकाला दिघी पोलिसांनी अटक केली आहे.

मुलीने आरोपीचा त्रास असह्य झाल्यानंतर आपल्या आजीला याबाबत सांगितले. आजीने थेट पोलिसात धाव घेत माथेफिरू आरोपी विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर पोलिसांनी बाललैंगीक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Baner : खंडणी मागत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या महिलेसह एकावर गुन्हा

दुसऱ्या घटनेत एका तरुणीचा हात पकडून तिच्याशी (Dighi) गैरवर्तन करणाऱ्या अर्जून शशिकांत सप्पागुरु (वय 22, रा.देहुरोड) या रोडरोमियो विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी हा पीडित तरुणी घराजवळ मैत्रिणीसोबत बोलत उभी असताना आरोपीने गैरवर्तन केले तसेच तिचा पाठलाग केला. भोसरी पोलीस ठाण्यात पीडितेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.