Dighi : सोसायटीचे स्टिकर लावण्यास सांगितल्यावरून एकाला 17 जणांच्या टोळक्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज – सोसायटीमधील वाहनांवर स्टिकर लावत असताना एका तरुणाला स्टिकर लावण्यासाठी सांगितले असता त्याने त्याच्या भावला व दहा ते पंधरा साथीदारांना बोलावून स्टिकर लावण्याची विनंती करणा-यास बेदम मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि. 2) रात्री सव्वाआठ वाजता इंदूबन रेसिडेन्सी गेटवर दिघी रोड भोसरी येथे घडली.

सचिन सुभाष सूर्यवंशी (वय 41, रा. इंदुबन रेसिडेन्सी, भोसरी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मिश्रा यांची दोन मुले (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्यांच्या 15 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूर्यवंशी त्यांच्या सोसायटीच्या गेटवर थांबून सोसायटीमधील सर्व वाहनांवर स्टिकर लावला आहे की नाही ते तपासात होते. त्यावेळी सोसायटीतील मिश्रा यांचा मुलगा विना स्टिकरची गाडी सोसायटीमध्ये घेऊन आला. त्याला स्टिकर लावण्याची विनंती केली असता त्याने त्याच्या भावाला व 15 साथीदारांना बोलावून सूर्यवंशी यांना पट्ट्याने बेदम मारहाण केली. यामध्ये सूर्यवंशी यांच्या डोक्यात व डोळ्यास इजा झाली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like