Dighi : भरदिवसा घरफोडी करून चार लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज – दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरातून नऊ तोळे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 3 लाख 96 हजारांचा ऐवज पळवून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 5) गणेशनगर बोपखेल येथे घडली.

सखी भन्नीलाल विश्वकर्मा (वय 67, रा.गणेशनगर, बोपखेल) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सखी यांचे घर गुरुवारी दुपारी दीड ते पावणेचार या कालावधीत कुलूप लावून बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

बेडरूममधील कपाटाचे लॉक उचकटून नऊ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने आणि 2 लाख 5 हजार रुपयांची रोकड असा एकूण 3 लाख 96 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.