Dighi : मैत्रिणीच्या मित्राकडून महिलेची एक लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – महिलेच्या मैत्रिणीचा मित्र घरी आला. त्याने महिलेच्या घरातील कपाटातून रोख रक्कम आणि एटीएम चोरले. त्यानंतर महाबळेश्वर येथे जाऊन एटीएममधून 68 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर पैसे आणि एटीएम चोरीबाबत महिलेला सांगितले. चोरलेले पैसे देण्यासाठी पुरेशी रक्कम शिल्लक नसलेल्या बँकेचा चेक देऊन महिलेची फसवणूक केली. ही घटना 8 जुलै रोजी आळंदी आणि महाबळेश्वर येथे घडली.

सोफी जॉय शाह (वय 34, रा. वडमुखवाडी, आळंदी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निखिल दुर्गेश सुमन (रा. विरार (पूर्व), ठाणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोफी यांची मैत्रीण जॅनिस नॅझरीथ यांचा मित्र निखिल 8 जुलै रोजी सोफी यांच्या घरी आला. त्याने सोफी यांच्या घरातून कपाटात ठेवलेले एटीएम कार्ड आणि 40 हजार रुपये चोरले. त्यानंतर महाबळेश्वर येथे जाऊन सोफी यांच्या चोरलेल्या एटीएम वरून 68 हजार रुपये काढले. एकूण एक लाख 8 हजार रुपयांचा अपहार केल्यानंतर निखिल याने सोफी यांना सांगितले.

चोरी केलेले पैसे परत देण्यासाठी निखिल याने सोफी यांना चेक (धनादेश) दिला. ज्या खात्याचा चेक दिला, त्या खात्यामध्ये पैसे नसल्याने सोफी यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.