Dighi: नळाचे पाणी भरण्यावरून झालेल्या वादात महिलेवर धारदार वस्तूने वार

Dighi: A woman was attacked with a sharp object in a dispute over filling tap water या वादात आरोपी अमोल पवार याने धारदार वस्तूने भास्कर यांच्या पत्नीच्या हातावर वार केला. यात त्या जखमी झाल्या.

एमपीसी न्यूज – नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद झाला. या वादात एकमेकांना शिवीगाळ करत झालेल्या मारहाणीत महिलेवर धारदार वस्तूने वार केल्याची घटना घडली. हा प्रकार दिघीतील वडमुखवाडी येथे गुरूवारी (दि.16) सकाळी साडेआठच्या सुमारास घडला.

पोलिसांनी याप्रकरणी मालन अशोक पवार, पुनम अशोक पवार, अमोल अशोक पवार (सर्व रा. जगताप वस्ती, वडमुखवाडी, दिघी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रवींद्र भास्कर दिवेकर (वय 48, रा. जगताप वस्ती, वडमुखवाडी, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवार यांनी फिर्यादी भास्कर यांच्या पत्नीला नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण केली.

या वादात आरोपी अमोल पवार याने धारदार वस्तूने भास्कर यांच्या पत्नीच्या हातावर वार केला. यात त्या जखमी झाल्या. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.