Dighi : टेम्पोवर हल्ला करून व्यक्तीचे अपहरण

एमपीसी न्यूज – सहा जणांच्या टोळक्याने टेम्पोवर हल्ला करत टेम्पोमधून कामावर जाण्यासाठी निघालेल्या एका व्यक्तीचे अपहरण केले. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेआठच्या सुमारास पठारे मळा, च-होली बुद्रुक येथे घडली.

याप्रकरणी अंकुश गुलाब राठोड (वय 26, रा. सावरगाव, ता. जिंतूर, जि. परभणी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुभाष पाटील (रा. कोनावडे, ता. गारगोटी, जि. कोल्हापूर) आणि त्याच्या सहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुश गुरुवारी सकाळी त्यांचे आई-वडील, पत्नी, भाऊ व भावाची पत्नी असे सर्वजण टेम्पो (एम एच 12 / क्यू जी 5408) मधून कामावर जात होते. ते पठारे मळा येथे आले असता आरोपींनी अंकुश यांच्या टेम्पो पुढे एक आणि टेम्पोच्या मागे दोन बोलेरो कार थांबवून टेम्पोवर हल्ला केला.

बिअरच्या बाटल्या टेम्पोवर मारून टेम्पोतील कामासाठी चालविलेल्या टिकव व फावड्याचे दांडे घेऊन टेम्पोतील लोकांना मारहाण केली. तसेच अंकुश यांचे वडील गुलाबसिंग राठोड (वय 50) यांना जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये (एम एच 09 / 7300) नेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.