HB_TOPHP_A_

Dighi : दुचाकीला ओव्हरटेक करणा-या आयशर टेम्पोची कारला धडक

106

एमपीसी न्यूज – दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे जाणा-या आयशर टेम्पोने समोरून येणा-या कारला धडक दिली. ही कार एका दुचाकीला धडकली. यामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आळंदी पुणे रोडवर बीटूबी ऑफिसर क्वार्टर गेटच्या समोर मंगळवारी (दि. 4) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

HB_POST_INPOST_R_A

विठ्ठल लहानू रणखांब (वय 35, रा. सिल्वर जिम जवळ, जाधववाडी, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात शुभम साहेबराव नलावडे (वय 21, रा. ओटास्कीम, निगडी), जित लालटा प्रसाद विश्वकर्मा (वय 35, रा. आदर्शनगर, दिघी) अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विठ्ठल आयशर टेम्पो घेऊन आळंदी-पुणे या मार्गावरून जात होता. बीटूबी ऑफिसर क्वार्टर गेटजवळ आल्यानंतर त्याने रस्त्याने जाणा-या दुचाकीस्वाराला ओव्हरटेक करून वेगात पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीला ओव्हरटेक करत असताना त्याच्या टेम्पोची धडक समोरून येत असलेल्या शुभम नलावडे यांच्या कारला (एम एच 04 / 9953) बसली. या धडकेत नलावडे यांची कार फिरली आणि रस्त्याने जात असलेल्या विश्वकर्मा यांच्या दुचाकीला (एम एच 14 / 6014) धडकली. या अपघातात कारचालक नलावडे आणि विश्वकर्मा हे दोघेजण गंभीर जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: