Dighi Accident News: भरधाव दुचाकी ट्रॅक्टरवर आदळून दुचाकीस्वार ठार

A two-wheeler collided with a tractor, killing the rider

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 24) दुपारी दोन वाजता पुणे-आळंदी रोडवर दिघी येथे घडला.

किशोर कुंडलीक थूल (वय 45, रा. संत गजानन महाराज नगर, दिघी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मयत किशोर थूल त्यांच्या होंडा शाईन दुचाकीवरून (एमएच 14 / जीबी 4452) पुणे आळंदी रोडने मॅगझीन चौकाकडे जात होते. ते तालेरा गोडाऊन समोर आले असता त्यांच्या दुचाकीने पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये किशोर गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.