BNR-HDR-TOP-Mobile

Dighi : देहूफाटा येथे झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

517
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – बस आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवारी) दुपारी पावणेतीनच्या सुमारास दिघी येथील देहूफाटा येथे घडला.

कैलास काशिनाथ नाईक (वय 24, रा. केळगाव रोड, आळंदी देवाची) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कैलास त्याच्या ऍक्टिव्ह दुचाकीवरून जात होता. दिघी येथील देहूफाटा येथे आला असता त्याची बसला धडक बसली. यामध्ये कैलास गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3