Dighi : जमिनीच्या वादातून टोळक्याची तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – जमिनीच्या वादातून तरुणाला त्याच्या घरासमोर जाऊन सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 26) दुपारी दीडच्या सुमारास वडमुखवाडी येथे घडली.

शंकर तापकीर, चंद्रकांत तापकीर, अशोक तापकीर, तुषार तापकीर, राजाराम तापकीर, सुदाम तापकीर (सर्व रा. वडमुखवाडी, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रियंका भाऊसाहेब तापकीर (वय 24) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंकाचा भाऊ आणि आरोपी यांच्यात जमिनीवरून वाद सुरु होता. त्यातून आरोपींनी बुधवारी दुपारी प्रियंका यांच्या घरासमोर येऊन त्यांच्या भावाला बाहेर बोलावून घेतले. घरासमोर प्रियंकाच्या भावाला आरोपींनी बेदम मारहाण केली. ही भांडणे सोडवण्यासाठी प्रियंका गेल्या असता त्यांनाही आरोपींची भिंतीवर ढकलून दिले. यात त्यांच्या हाताला, पायाला व पाठीला मार लागला. आरोपींनी भांडणात प्रियंका यांचा मोबाईल फोन फोडला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.