Dighi : जाब विचारला म्हणून पती-पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज – माझ्याकडे का बघताय असे विचारले असता (Dighi ) त्याचा राग येवून तीन ते चार जणांनी पती –पत्नीला बेदम मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.3) संध्याकाळी वडमुखवाडी येथे घडली आहे.

याप्रकऱणी विवेक जगन्नाथ जाधव (वय 40 रा.दिघी) यांनी रविवारी (दि.4) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून राहूल तापकीर (रा. दिघी) , कुंडलीक तापकीर व त्यांचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pune : ‘त्या’ तीन लोकसभा मतदार संघाच्या आढावा बैठकीला शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यानी आरोपींना माझ्याकडे का बघताय अशी विचारणा केली असता त्याचा राग येवून फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी फिर्यादी यांच्या पत्नी त्यांना सोडविण्यासाठी आल्या असता आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की केली.

या मारहाणीत फिर्यादी यांच्या हाताचा पंजा फ्रॅक्चर झाला.यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील (Dighi ) तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.