Dighi : निवडणुकीत मुलाच्या नावावर केलेले घर पुन्हा आपल्या नावावर करण्यासाठी भाजप नगरसेवकाची मुलाला धमकी

पत्नीची नगरसेवक पतीविरोधात तक्रार

0

एमपीसी न्यूज – निवडणुकीच्या वेळी मुलाच्या नावावर केलेले घर पुन्हा आपल्या नावावर करून देण्यासाठी भाजप नगरसेवकाने स्वतःच्या मुलाला धमकी दिली, अशी फिर्याद नगरसेवकाच्या पत्नीने दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत  नगरसेवकाच्या पत्नीने  (वय 44, दिघी) यांनी गुरुवारी (दि. 21) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारी रोजी नगरसेवक  यांनी  आपल्या मुलाला धमकी दिली. ‘हे घर मी जागा घेऊन बांधले आहे. निवडणुकीच्यावेळी मी हे घर माझ्या नावावरून तुझ्या नावावर केले आहे.

ते आता परत माझ्या नावावर करून दे, नाहीतर तुम्हाला भीक मागायला लावेल. तुम्हाला दिघी गावात राहू देणार नाही’, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like