Dighi : महिलेच्या फोटोचा अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची मागणी

पाच जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेशी फोनवर ओळख वाढवून तिचे फोटो मिळवले. त्या फोटोची अश्लील व्हिडिओ क्लिप बनवली. ती व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. तसेच नातेवाईकांमध्ये क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. त्याचबरोबर पतीला सोडून देऊन लग्नाची मागणी घातली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मागील तीन महिन्यांपासून दिघी येथे घडला.

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन महिन्यांपूर्वी यामधील एका आरोपीने फिर्यादी महिलेच्या फोनवर वारंवार फोन करून ओळख केली. त्याद्वारे त्याने महिलेचे फोटो काढून घेतले. त्यानंतर अन्य आरोपींसोबत संगनमत करून आपले आणि महिलेच्या फोटोची एक अश्लील व्हिडिओ क्लिप तयार केली. ही व्हिडिओ क्लिप आरोपींनी फिर्यादी यांच्या समाजातील लोकांच्या मोबाईलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवली. यामुळे फिर्यादी महिलेची त्यांच्या समाजात मोठ्या प्रमाणात बदनामी झाली.

त्यानंतर आरोपींनी महिलेकडे तीन लाख रुपयांची मागणी करत भाऊ, पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. ‘पतीला सोडून देऊन माझ्याशी लग्न कर, आपण मस्त मज्जा करू’ असे म्हणून महिलेचा विनयभंग केला. याबाबत महिलेने दिघी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. पोलीस उपनिरीक्षक भारत चपाईतकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.