Dighi : दिघीत आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते बुद्ध रुपाची प्रतिष्ठापना

एमपीसी न्यूज- आमदार महेश लांडगे यांच्या विशेष प्रयत्नातून दिघी गावठाण येथे साकारण्यात आलेल्या नवीन विहाराची वास्तूमध्ये बुद्ध रुपाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. आज (शनिवारी) सायंकाळी सात वाजता आमदार लांडगे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

दिघी येथे आज दिवसरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते बुद्ध रुपाची स्थापना केली जाणार आहे. महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, वसंत बोराटे, लक्ष्मण सस्ते, राजेंद्र लांडगे, रवी लांडगे, नितीन लांडगे, संतोष लोंढे, सागर गवळी, संतोष कांबळे, नगरसेविका हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, सुवर्णा बुर्डे, अश्विनी जाधव, स्विनल म्हेत्रे, साधना मळेकर, सारिका बो-हाडे, सारिका लांडगे, यशोदा बोइनवाड, सोनाली गव्हाणे, भिमाबाई फुगे, नम्रता लोंढे, कुलदीप परांडे, लक्ष्मण डोळस, सुहास डोळस, राज भोसले, विनोद डोळस, रुपेश डोळस, सागर डोळस उपस्थित राहणार आहेत.

आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नानातून कपिलवस्तू बुद्ध विहार येथे नवीन विहाराची वास्तू साकारण्यात आली आहे. ही वास्तू अतिशय प्रशस्त आहे. या वास्तुमध्ये बुद्ध रुपाची स्थापना केली जाणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये जास्तीत-जास्त संख्येने शुभ (पांढरे)वस्त्र परिधान करुन सहभागी होण्याचे आवाहन कपिलवस्तू बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड आणि नगरसेवक विकास डोळस यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.