Dighi : घरफोडी करून दागिने, रोकड लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कुलूप लावून बंद असलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. घरातून चोरट्यांनी 82 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 4) सकाळी अकराच्या सुमारास दिघी येथे उघडकीस आली.

रमेश विष्णू करडे (वय 75, रा. चौधरी पार्क, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करडे 31 डिसेंबर रोजी सकाळी कामानिमित्त बाहेरगावी गेले. दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरातून 9 तोळे 7 ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 82 हजारांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी करडे गावाहून शनिवारी सकाळी परत आले असता हा प्रकार उघडकीस आला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.