Dighi : मंदिराच्या बाहेरून दर्शन घेताना महिलेचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज – मंदिराच्या बाहेर उभा राहून दर्शन घेत असलेल्या महिलेचे अज्ञात चोरट्याने मिनी गंठण जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 28) दुपारी साडेपाचच्या सुमारास चौधरी पार्क दिघी येथे घडली.

सुनीता नारायण पेहरकर (वय 35, रा. दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सुनीता दुपारी साडेपाचच्या सुमारास चौधरी पार्क येथील महादेव मंदिरात मंदिराच्या बाहेर उभे राहून दर्शन घेत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या डोक्यात अणकुचीदार हत्याराने मारले. यामध्ये त्यांच्या डोक्यात दुखापत झाली. चोरट्याने याचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे 60 हजार रुपये किमतीचे मिनी गंठण चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.