Dighi : बांधकाम व्यावसायिकाकडून ग्राहकाची साडेसात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फ्लॅट घेण्यासाठी एका ग्राहकाने बांधकाम व्यावसायिकाला 7 लाख 53 हजार 434 रुपये दिले. पैसे देऊन अडीच वर्ष उलटले मात्र बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच भरलेले पैसे देखील परत दिले नाहीत. ही घटना वडमुखवाडी पुणे येथे नोव्हेंबर 2016 ते 1 ऑगस्ट 2019 या कालावधीत घडली.

राजेश मधुकरराव कामठेकर (वय 40, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महेश लोंढे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरॅकल नाईन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीची वडमुखवाडी येथे बांधकाम साईट सुरु आहे. राजेश याने कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बांधकाम साईटमध्ये 800 चौरस फुटांचा एक फ्लॅट बुक केला. त्यापोटी राजेश यांनी महेश लोंढे याला नोव्हेंबर 2016 पासून 7 लाख 53 हजार 434 रुपये दिले. पैसे घेऊन दिलेल्या मुदतीत महेश याने राजेश यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. वेळेत फ्लॅट न मिळाल्याने राजेश यांनी भरलेले पैसे परत मागितले. पैसे देण्यासाठी महेश याने उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत राजेश यांनी पोलिसात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.