Dighi : यात्रेत गाणी लावण्यावरून वाद; बाप-लेकाला जीवे मारण्याची धमकी, सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – यात्रेच्या कार्यक्रमांमध्ये गाणी लावण्याच्या कारणावरून वाद झाला. यामध्ये सात जणांनी मिळून वडील आणि मुलाला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि.16) अडबंग महाराज मंदिरासमोर, डुडुळगाव येथे घडली.

महेंद्र तानाजी पवार, अमर रामदास पवार, सौरभ बाळासाहेब पवार, विशाल अरुण पवार, सोमनाथ अरुण पवार, अमोल गाडे, भैय्या डोळस (सर्व रा. डुडुळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोपट नागू शिंदे (वय 47) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी डुडुळगाव येथे अडबंग महाराज यात्रेचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये गाणी लावण्याच्या कारणावरून फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये वाद झाला. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

तसेच त्यानंतर हातात कोयते, काठ्या व दगड घेऊन दहशत निर्माण केली. आरोपी सौरभ पवार याने कोयता घेऊन फिर्यादी यांना व त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.