Dighi Crime : आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या रोड रोमीओवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एकतर्फी प्रेमातून तरुणाने (Dighi Crime) अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. तिच्याकडे प्रेमाची मागणी करत तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2021 ते 3 नोव्हेंबर 2022 या कालावधीत दिघी परिसरात घडला.

आकाश नारायण जाधव (वय 20, रा. दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Smart city : स्मार्ट सिटीच्या जनरल मॅनेजरपदी सहशहर अभियंता मनोज सेठिया यांची नियुक्ती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी मुलीचा जाता येता (Dighi Crime) पाठलाग केला. आरोपीने मुलीकडे प्रेमाची मागणी केली. ती जर नाही म्हणाली तर त्याने स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिली. वारंवार त्याने पाठलाग करून अशा प्रकारची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.