BNR-HDR-TOP-Mobile

Dighi : शेतीच्या वादातून एकाला मारहाण

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज  – शेतीतील खड्ड्यात माती भरण्याच्या वादातून पाच ते सहा जणांनी एकाला मारहाण झाली आहे. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.

रुपेश कृष्णजा फुगे (वय 36, रा. फुगे चाळ, आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भाऊसाहेब खंडू फुगे, मारुती खंडू फुगे, कृष्णाबाई खंडू फुगे, स्वाती भाऊसाहेब फुगे, रुपाली मारुती फुगे आणि इतर दोन मुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश फुगे हे शेतीतील खड्ड्यात माती भरत असताना भाऊसाहेब याने त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी यांना मारहाण करत शिवीगाळ ही करण्यात आली. तसेच आरोपींनी फिर्यादीच्या आई-वडीलांना जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून रुपेश यांनी दिघी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
.