Dighi Crime News : रस्त्याने जाता-येता अश्लील शेरेबाजी करत तरूणीचा विनयभंग; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाता-येता अश्लील शेरेबाजी करत तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दिघी परिसरात घडला.

लाल पठाण, सोहेल पठाण, समरीन लाल पठाण (तिघे रा. दिघी रोड भोसरी), तौफिक (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 20 वर्षीय तरुणीने 8 मे रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 एप्रिल रोजी सायंकाळी फिर्यादी दिघी रोड कॉर्नरवर रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्यावेळी आरोपी लाल, सोहेल आणि तौफिक यांनी फिर्यादी यांच्याबाबत अश्लील शेरेबाजी केली. त्यानंतर पंधरा दिवसांनी आरोपी सोहेल याने पुन्हा फिर्यादी यांच्याबाबत अश्लील शेरेबाजी करून त्यांचा विनयभंग केला.

21 एप्रिल रोजी आरोपी लाल गुटखा खाऊन फिर्यादी यांच्या घरासमोर थुंकला. त्याचा फिर्यादी यांनी फोटो काढला. याबाबत आरोपी लाल याने फिर्यादी यांना शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच आरोपी समरीन हिने देखील फिर्यादी यांना शिवीगाळ केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.