Dighi crime News : रिक्षा चालकाला जीवे मारण्याची धमकी देत मोबाईल हिसकावणाऱ्या प्रवाशावर गुन्हा दाखल

याबाबत दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज – प्रवासी म्हणून बसलेल्या तरुणाने रिक्षाला चालकाला शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देऊन त्याचा मोबाईल फोन हिसकावला. याबाबत प्रवासी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 जुलै रोजी च-होली डोंगराजवळ घडली. याबाबत दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित शंकर पाटील (वय 22, रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. सुधाकर शिवाजी म्हस्के (वय 45, रा. शेवंताबाई काटे चाळ, दापोडी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी म्हस्के 9 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता प्रवासी भाड्यासाठी रिक्षा घेऊन फिरत होते. त्यावेळी आरोपी रोहित पिंपळे गुरव येथून त्यांच्या रिक्षात बसला. आरोपीने म्हस्के यांना येरवडा, विमाननगर, लोहगाव, दिघी मार्गे च-होली येथे डोंगराजवळ आणले.

तिथे म्हस्के यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन म्हस्के यांचा 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावला. याबाबत दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.