Dighi Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचे अपहरण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका व्यक्तीचे अपहरण केले. याबाबत चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 23) सकाळी डुडुळगाव येथे घडला.

रतन अनिल देवगिरे (वय 35) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत प्रतिभा रतन देवगिरे (वय २५, रा. डुडुळगाव) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार निलेश हांडे (वय 30), पियुष म्हेत्रे (वय 25), परमा लोंढे (वय 28), बाळासाहेब मुंडे (वय 35, सर्व रा. भीमनगर, औसा, जि. लातूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती रतन यांनी आरोपींकडून पूर्वी काही पैसे घेतले होते. ते पैसे न दिल्याच्या कारणावरून आरोपींनी मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास इनोव्हा कार (एम एच 24 / ए डब्ल्यू 9358) मधून रतन यांचे अपहरण केले.

फिर्यादी यांच्या पतीला कारमधून जबरदस्तीने नेल्यानंतर आरोपी फिर्यादी यांच्या दिराच्या फोनवर फोन करून पैशांची मागणी करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.