Dighi Crime News: बीट मार्शलच्या प्रसंगावधानामुळे शटर उचकटून चोरी करणारा चोरटा गजाआड

एमपीसी न्यूज – गस्त घालताना एका दुकानाचे शटर उचकटलेले दिसल्यामुळे पोलिसांनी आसपास शोध घेतला असता एक चोरटा मिळून आला तर दुसरा अंधाराचा फायदा घेत पळून गेला. ही घटना पुणे आळंदी रोडवरील चोविसावाडी येथे सोमवारी पहाटे घडली.

सोहेल इसाक शेख (वय 19, रा. अमीन कॉलनी, धार रोड, परभणी. सध्या पुणे फिरस्ता) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रूपेश रमेश तापकीर (वय 28, रा. पठारे कॉलनी, दिघी) यांनी सोमवारी (दि. 26) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एमपीसी न्यूज – अंतरंग दसरा विशेषांक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विवेक लावंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्यातील अंमलदार भोसुरे आणि मरभळ हे रात्रगस्तीवर होते. त्यांना चोविसावाडी येथील एका दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. यामुळे संशय आल्याने त्यांनी चोरट्यांचा आसपास शोध घेतला.

दोनपैकी एक चोरटा पोलिसांच्या हाती लागला तर दुसरा अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला.अटक केलेल्या चोरट्याकडून चोरी केलेली 12 हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.