Dighi Crime News : पैशांच्या देवाणघेवाणीवरून महिलेस मारहाण

एमपीसी न्यूज – पैशांच्या देवाणघेवाणीवरून तिघेजण नातेवाईक महिलेला शिवीगाळ व मारहाण करत असल्याने एक तरुण भांडण सोडविण्यासाठी गेला. मात्र, तिघांनी मिळून तरुणाला देखील मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 22) रात्री मॅगझीन चौक, दिघी येथे घडली.

कांताराम बेंद्रे (वय 45), अक्षय कांताराम बेंद्रे (वय 20), आदित्य कांताराम बेंद्रे (वय 19, तिघे रा. मॅगझीन चौक, गजानन नगर, दिघी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत सुनील रामराव हातगळे (वय 18, रा. मॅगझीन चौक, गजानन नगर, दिघी) यांनी मंगळवारी (दि. 23) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्या भावाची पत्नी आशा शिवाजी इक्कर यांचे पैशांच्या देवाणघेवाणीवरून सोमवारी रात्री सव्वादहा वाजता भांडण सुरु होते. तीनही आरोपी मिळून आशा इक्कर यांना शिवीगाळ करून मारहाण करत होते.

त्यावेळी फिर्यादी त्यांची रिक्षा घेऊन तिथून जात होते. भावाच्या पत्नीला मारहाण होत असल्याने फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी आले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना दगडासारख्या वस्तूने आणि काठीने मारून जखमी केले.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.