Dighi Crime News : कारवाईसाठी अडविल्याने पोलिसांना मारहाण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – कारवाईसाठी अडविल्यामुळे तीन जणांनी पोलिसांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 6) सायंकाळी डुडुळगाव येथे घडली.

सागर बाळु गावडे (वय 28), सहजानंद निजानंद गावडे (वय 26) आणि सुरेश उत्तम कातडे (वय 30, तिघेही रा. आळंदी, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस कर्मचारी हरिराम तुळशीराम डुमनर यांनी गुरुवारी (दि. 6) याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या पार्श्‍वभूमीवर दिघी पोलीस गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास डुडुळगाव जकात नाका येथे  कारवाई करीत होते. त्यावेळी एमएच 14 / जेएल 919 या टेम्पोला  कारवाईसाठी थांबविले.

यामुळे संतापलेल्या आरोपींनी तुम्हाला कारवाईसाठी आम्हीच दिसतो का, फक्‍त आमच्याच पावत्या का करतात. आमच्यावर कारवाई करणारे तुम्ही कोण, अशी विचारणा करीत पोलिसांना धक्‍काबुक्‍की आणि मारहाण केली. तसेच दगड घेऊन पोलिसांच्या अंगावर धावून आले.   पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला.

पोलीस उपनिरीक्षक भदाणे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.