Dighi Crime News : गिफ्ट व्हाऊचर देण्याच्या बहाण्याने पळविली कार

एमपीसी न्यूज – गिफ्ट व्हाऊचर देण्याच्या बहाण्याने एका महिलेसह तीन चोरट्यांनी मोटार आणि मोबाइल चोरून नेला. ही घटना चऱ्होली येथे गुरुवारी (दि. 12) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.

विठ्ठल यशवंत रसाळ (वय 70, रा. नंदादीप सोसायटी, पुणे आळंदी रोड, चऱ्होली) यांनी शुक्रवारी (दि. 13) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेसह तीन अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने गुरूवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी रसाळ यांना जिओचे गिफ्ट व्हाऊचर आले असून ते घेऊन जाण्यासाठी चऱ्होली फाटा येथे बोलविले. त्यानंतर फिर्यादी रसाळ यांच्या मोटारीमधून चऱ्होली येथील स्मशानभूमीजवळ जाऊन रसाळ यांना तेथील मंदीरात देवदर्शनासाठी पाठविले. दुपारी दोन वाजताच्या सुमारास रसाळ हे देवळात गेल्याचे पाहताच आरोपींनी त्याची मोटार आणि मोबाइल घेऊन पळ काढला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.