Dighi crime News : महिलेचा विनयभंग करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेला आणि तिच्या भावाला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 2) दुपारी चोवीसावाडी येथील खडी मशीनजवळ येथे घडली.

रतनकुमार बाबुराव सूर्यवंशी (वय 35, रा. जाधववाडी, मोशी), बजरंग शेषाराम कांबळे (वय 28, रा. चाकण), प्रथमेश विष्णू कांबळे (वय 21), पवन विष्णू कांबळे (वय 19, रा. स्पाईन रोड, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या घरी काम करत असताना आरोपी तिच्या घरी आले. आरोपींनी महिलेला आणि तिच्या भावाला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच आरोपींनी महिलेचा हात पकडून तिच्यासोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.