Dighi Crime News : हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा

40 हजारांचा दारूसाठा जप्त

एमपीसी न्यूज –  बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या एका हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 39 हजार 268 रुपयांची विदेशी दारू आणि बियर जप्त केली.

सुयश वसंत कु-हाडे (वय 28, रा. कु-हाडे आळी, आळंदी) याच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशीकडून आळंदीकडे जाणा-या रोडवर डुडुळगाव येथे श्री व्हेज नॉनव्हेज या हॉटेलमध्ये विनापरवाना दारू व बिअरची विक्री केली जाते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

त्यावरून पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून 39 हजार 268 रुपयांची विदेशी दारू आणि बिअर, 35 हजार 240 रुपयांची रोख रक्कम आणि 9 हजारांचा मोबाईल फोन, असा एकूण 83 हजार 508 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.