Dighi Crime News : पोलीस चौकीसमोरच कामगाराच्या डोक्यात घातली फरशी

एमपीसी न्यूज – मोठ्या भावाचे बांधकाम थांबवले तसेच शिवीगाळ करून मारहाण देखील केली. याबाबत मोठा भाऊ, त्यांची पत्नी आणि कामगार असे तिघेजण पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी गेले असता लहान भावाने पोलीस चौकीसमोर येऊन कामगाराच्या डोक्‍यात फरशीचा तुकडा मारला. यात कामगार जखमी झाला. ही घटना चांभारवाडा च-होली बुद्रुक येथे बुधवारी (दि. 8) दुपारी घडली.

सुरेश भैय्या लोदी (वय 45) असे जखमी कामगाराचे नाव आहे. याबाबत तानाजी अनंदा गाडेकर (वय 62, रा. थिटेवस्ती, खराडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमंत अनंदा गायक गाडेकर (वय 52, रा. च-होली बुद्रुक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तानाजी गाडेकर, त्यांच्या पत्नी शोभा गाडेकर आणि कामगार सुरेश लोदी असे तिघेजण फिर्यादी यांच्या घराचे बांधकाम करत होते. गुरुवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास आरोपी तिथे आला. त्याने बांधकाम करायचे नाही, असे म्हणून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. याबाबत फिर्यादी त्यांची पत्नी आणि कामगार असे च-होली पोलीस चौकी येथे तक्रार देण्यासाठी आले. त्यांच्यामागे आरोपी हनुमंत देखील आला. त्याने हातातील शहाबादी फरशीचा तुकडा कामगार सुरेश लोदी याच्या डोक्यात मारून त्यास जखमी केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.