Dighi Crime News : दहा लाखांच्या कर्जाच्या आमिषाने 90 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून दहा लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी 90 हजार रुपये घेऊन एका व्यक्तीची फसवणूक केली. याबाबत सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 19 ते 25 मार्च 2019 या कालावधीत दिघी येथे घडला.

अनिता एस शेळके, अविनाश (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही), आशाराणी मिश्रा, विशाल यादव, प्रदीप कुमार (तिघे रा. उत्तर प्रदेश), अर्ष अली (रा. नवी दिल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत राजेश लक्ष्मण गुडे (वय 45, रा. हिंदू कॉलनी, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिता आणि अविनाश यांनी फिर्यादी यांना तीन मोबाइल क्रमांकावरून फोन केले. आम्ही बजाज फायनान्स कंपनीतून बोलत आहोत, असे सांगून फिर्यादी यांना व्हाट्सअप व इमेलवर मेसेज पाठवले.

फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना दहा लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी फिर्यादी यांच्याकडून 90 हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना कर्ज न देता त्यांची फसवणूक केली.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.