Dighi Crime News : ‘रस्त्यावर, घरात घुसून, परत रस्त्यावर’ मित्राने मित्राला तीनवेळा विनाकारण बडवले

एमपीसी न्यूज – रात्री कामावरून घरी येत असलेल्या तरुणाला मित्राने विनाकारण मारले. मित्र त्याच्या घरी गेल्यावर घरात घुसून आणखी मारले. मारहाणीचा जाब विचारण्यासाठी मित्र घरासमोर रस्त्यावर आला असता परत रस्त्यावर मारले. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 24) रात्री रोडे हॉस्पिटल समोर, दिघी येथे घडली.

महेश किशोर भोसले (वय 27, रा. रोडे हॉस्पिटल शेजारी, दिघी. मूळ रा. सनगाव सांगाव बीड) असे मारहाण झालेल्या मित्राचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील मोहन चांदोरे (वय 24, रा. दिघी. मूळ रा. शिंदी, जि. बुलढाणा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास कामावरून घरी येत होते. त्यावेळी भोसले यांचा मित्र सुनील याने भोसले यांना विनाकारण हाताने व बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर भोसले घरी गेले. सुनील याने भोसले यांना घरात घुसून मारहाण केली.

मारहाण करून आरोपी सुनील रस्त्यावर गेला. या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी भोसले रस्त्यावर गेले. सुनीलला जाब विचारला असता त्याने पुन्हा शिवीगाळ करून मारहाण केली. दगड डोक्यात मारून भोसले यांना जखमी केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.