Dighi Crime News : विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
रजत संजय बोर्डे (वय 27, रा. परांडे नगर, दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मयत विवाहितेच्या वडिलांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 22 वर्षीय मुलगी आणि आरोपी रजत यांचा विवाह झाला होता. रजत याने फिर्यादी यांच्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने 4 एप्रिल रोजी रात्री विश्रांतवाडी येथे आत्महत्या केली.
याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी पती रजत याला अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.