-MPC-TOP-MOST-BANNER-I

Dighi Crime News : सुरक्षारक्षकाच्या घरातून दागिने दुचाकी रोख रक्कम चोरीला

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी दागिने, दुचाकी आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 17) पहाटे चोविसावाडी येथे उघडकीस आली.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

रणजीत अभिमान गायकवाड (वय 48, रा. चोविसावाडी) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यांचे घर बुधवारी रात्री साडेअकरा ते गुरुवारी पहाटे साडेपाच या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून 64 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 35 हजार रुपये किमतीची एक दुचाकी (एम एच 14 / ई एक्स 2182) आणि दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख नऊ हजाराचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.