Dighi Crime News : सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा विनयभंग; माहेरहून पैसे आणण्यासाठी केला छळ

एमपीसी न्यूज – सासरच्या लोकांनी विवाहितेकडे हुंड्याची मागणी केली. हुंडा न दिल्याने विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला. दिराने विवाहितेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याची फिर्याद पीडित विवाहितेने दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे.

त्यानुसार पती, सासू, दोन दीर आणि नणंद, जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2019 ते 10 मार्च 2021 या कालावधीत च-होली बुद्रुक येथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या लोकांनी विवाहितेकडे हुंड्याची मागणी केली. हुंड्याचे पैसे न दिल्याने सासरच्या लोकांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. दिराने विवाहितेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला.

विवाहिता सासरी आली म्हणून सासू, नणंद, जाऊ, दिर यांनी तिच्यासोबत वाद घालून शिवीगाळ करत मारहाण केली. माहेरहून पैसे आणले नाहीत म्हणून पतीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. सासूने विवाहितेला बेडरूममध्ये बंद केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.