Dighi Crime News : मूल जन्माला येऊ नये म्हणून विवाहितेचा छळ; पोटातच गर्भाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मूल जन्माला येऊ नये यासाठी पतीने पत्नीचा छळ केला. तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. पत्नीने गोळ्या न खाल्ल्याने तिला मारहाण केली. त्यात पत्नीच्या पोटातच गर्भाचा मृत्यू झाला. हा प्रकार च-होली बु. चोविसावाडी येथे ऑगस्ट 2019 ते 18 मार्च 2021 या कालावधीत घडला.

केतन राजू तापकीर (वय 28, च-होली बु. चोविसावाडी, आळंदी) त्याचे आई आणि वडील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत विवाहितेने मंगळवारी (दि. 13) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहित महिला घरातील कामे करत नाही. त्यांना जेवण बनवता येत नाही. कचरा व्यवस्थित साफ करत नाही. अशा कौटुंबिक कारणावरून सासरच्या लोकांनी तिला शिवीगाळ करून भांडण केले. पती केतन याने मूल ठेवायचे नाही, म्हणून गर्भपात करण्यासाठी डॉक्टरकडे नेऊन गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या.

विवाहितेने गोळ्या खाल्ल्या नाहीत. त्यावरून भांडण काढून मूल जिवंत जन्माला न येण्याच्या उद्देशाने विवाहितेला हाताने मारहाण करून भिंतीवर आपटले. यात विवाहितेचा रक्तस्त्राव होऊन तिच्या पोटातील गर्भाचा पोटातच मृत्यू झाल्याने गर्भपात झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.