Dighi crime News : पैसे घेऊन फ्लॅटचे ॲग्रीमेंट न करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – फ्लॅटसाठी पैसे घेऊन फ्लॅटचे ( Flat) ॲग्रीमेंट ( Agreement) न करता फसवणूक ( Cheating) केल्याप्रकरणी तिघा बांधकाम व्यावसायिकांच्या ( Builder) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार सप्टेंबर 2018 ते 2 जानेवारी 2021 या कालावधीत चोविसावाडी ( chovisawadi)  येथील ‘कॅलिक्स अतुल्य रघुकुल’ या (Calyx atulya Raghukul) बांधकाम साईटवर घडली.

गौरव सुनील सोमाणी, शामकुमार लड्डा, योगेश जाधव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत डॉ. सचिनकुमार महारु वाघ (वय 34, रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची चोविसावाडी येथे कॅलिक्स अतुल्य रघुकुल ही बांधकाम साईट सुरु आहे. त्यात फ्लॅट घेण्यासाठी फिर्यादी वाघ यांच्या सासू आणि सास-यांनी वेळोवेळी आठ लाख 38 हजार 936 रुपये दिले.

पैसे घेऊनही आरोपींनी फ्लॅटचे ॲग्रीमेंट केले नाही. याबाबत तीन जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिघी पोलीस (Dighi Police station )तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.