Dighi Crime News : कामावरून काढून टाकल्याच्या रागातून चाकूने वार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – कापड दुकानात काम करणाऱ्या कामगारासोबत एका तरुणाचे भांडण झाले. या कारणावरून दुकानदाराने संबंधित कामगाराला कामावरून काढून टाकले. त्यावरून कामगार तरुणाने एका तरुणावर चाकूने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 12) सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास काळे कॉलनी नंबर 3 देहू फाटा येथे घडली.

अनुप अशोक साबळे (वय 28) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत प्रमोद गुलाबराव वकटे (वय 37, रा. काळे कॉलनी नंबर 3, देहूफाटा) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमोल रामदास रामेकर (वय 28, रा. वडाळी, माळेगाव, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगार तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद आणि जखमी अनुप हे नातेवाईक आहेत. आरोपी अमोल हा चऱ्होली बुद्रुक येथे मयुरी कलेक्शन या कपड्याच्या दुकानात कामाला होता. जखमी अनुप आणि आरोपी अमोल यांचे कापड दुकानात किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यानंतर दुकानदाराने अमोलला कामावरून काढून टाकले. त्या कारणावरून अमोल याने रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास अनुपवर चाकूने वार करत खुनी हल्ला केला. या हल्ल्यात अनुप गंभीर जखमी झाला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.