Dighi Crime News : जागेचे फोटो काढण्यासाठी गेलेल्या फोटोग्राफरसह दोघांवर पाळीव श्वानाचा हल्ला

श्वानाच्या मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जागेचे फोटो आणि व्हिडीओ चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या एका फोटोग्राफर आणि एका कामगाराच्या अंगावर शेजारी राहणाऱ्या एका घरातील दोघांनी मिळून जाणीवपूर्वक घरातील श्वान सोडून दिला. श्वानाने फोटोग्राफर आणि एका कामगाराचा चावा घेत त्यांना जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 20) दुपारी एक वाजताच्या सुमारास रुणवाल पार्क, दिघी येथे घडली.

शुभम नरेश चौधरी (वय 19, रा. साई पार्क गणेश कॉलनी, दिघी), थावरा देविदास आडे (रा. गायकवाडनगर, दिघी) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत शुभम यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गजेंद्र सिंहराणा (वय 60), सीमा राणा रावत (वय 35, दोघे रा. रुणवाल पार्क, दिघी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप वाळके यांची दिघी येथील रुणवाल पार्क येथे जमीन आहे. त्या जमिनीचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी फिर्यादी शुभम गेले होते. त्यावेळी तिथे जखमी थावरा देविदास आडे आणि गजानन वसंता राठोड हे दोघेजण काम करत होते.

फिर्यादी शुभम फोटो आणि शूटिंग करत असताना जवळच राहत असलेल्या आरोपींनी त्यांच्या डॉबरमॅन जातीच्या पाळीव श्वानाला जाणीवपूर्वक चावा घेण्याच्या उद्देशाने मोकळे सोडले. त्यानंतर श्वानाने फिर्यादी शुभम आणि कामगार थावरा यांना चावा घेऊन जखमी केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.