Dighi Crime News : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ ; सासरच्या पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.19) ताजने मळा, चऱ्होली याठिकाणी हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी पीडित महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती सुधीर सतिश गायकवाड, सासु रंजना सतिश गायकवाड, दिर समीर सतिश गायकवाड, जाऊ वैशाली समीर गायकवाड, नणंद प्रिती विल्सन साळवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला तिच्या माहेरहून दागिने, पैसे आणण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच, दिर व जाऊ यांनी उलट सुलट माहिती देऊन भांडणं लावली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

अधिक तपास एस. एम. भदाणे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.