Dighi Crime News : गर्लफ्रेंडबद्दल अपशब्द वापरले म्हणून मुलाने गळा आवळून केला बापाचा खून

एमपीसी न्यूज – सध्या सहशक्ती व संवेदनशीलतेचा अंत होत असल्याचे चित्र अनेक गुन्ह्यामधून समोर येत आहे. पुण्यात एका आईने प्रेमात आडव्या येणाऱ्या आपल्या चिमुरडीचा खून केल्या नंतर दिघी येथेही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलाच्या गर्लफ्रेंडला अपशब्द वापरला म्हणून पोटच्या मुलाने व पत्नीने गळा आवळून (Dighi Crime News) चक्क गळा आवळून खून केला आहे. हि घटना दिघी येथे रविवारी (दि.5) रात्री उशीरा घडली आहे.

 

MPC News Podcast 07 March 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

 

याप्रकरणी पोलिसांनी राहूल अशोक जाधव (वय 25), अनिल अशोक जाधव (वय 23) यांना दिघी पोलिसांनी अटक केली असून पत्नीवर ही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर अशोक रामदास जाधव (वय 45) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्या मुलीबद्दल मयत अशोक यांनी अपशब्द वापरले होते. याचाच राग येवून दोन मुलांनी घरातील (Dighi Crime News) दोरीने गळा आवळून अशोक यांचा खून केला. यावेळी फरशीवर पडलेले रक्ताचे डाग पुसत आईने पुरावा नष्ट कऱण्याचा प्रयत्न केला.तर राहूल याने मृतदेह घरातील फॅनला अडकवून आत्महत्या केल्याचा दिखावा केला. यावरून पोलिसांनी तिघांविरोधातही गुन्हा दाखल केला असून दिघी पोलीस याचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.