Dighi Crime News : महागड्या गाडीतून विदेशी दारू घेऊन जाणारे तिघे ताब्यात ; 41 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – महागड्या एन्डेव्हर गाडीतून विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या तिघांना दिघी पोलिसांनी आज (शनिवारी, दि. 24) अटक केली. त्यांच्याकडून विदेशी दारुसह 41 लाख 10 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विनोद मुरलीधर तापकीर (वय 30), आनंद ज्ञानेश्वर थोरवे (वय 30) व वसीम हुसेन शेख (वय 25) (सर्व रा. चऱ्होली, ता. हवेली) असे ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.

आरोपींवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या जवळून साडे दहा हजार किंमतीची विदेशी दारू तसेच, गुन्ह्यात वापरलेली 40 लाखांची (एमएच /14 जेएम /2828) ही एन्डेव्हर कार जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक भदाणे व पथक चऱ्होली गाव येथे विनामास्क फिरणा-या नागरिकांवर कारवाई करत होते. त्यावेळी एन्डेव्हर कारमधून तीन इसम जोरजोरात आरडाओरडा करत भरधाव वेगाने पठारे मळ्याच्या दिशेने चालले होते. त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते त्यांच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने पठारे मळ्याच्या दिशेने घेऊन गेले.

त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पठारे मळा याठिकाणी त्यांना ताब्यात घेतले. गाडीची पाहणी केली असता गाडीत साडे दहा हजार किंमतीची विदेशी दारू मिळाली. चौकशीअंती आरोपींनी लकी वाईन शॉप येथून दारु विकत घेतल्याचे सांगितले. लकी वाईन शॉप मालकाची चौकशी करून पुढील कारवाई केली जात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भदाणे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.