Dighi Crime News : लॉकडाऊनमध्ये विक्रीसाठी दारूचा साठा करणाऱ्या दोघांना अटक; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनमध्ये मद्याची दुकाने बंद झाल्यानंतर विक्रीसाठी मद्याची साठवणूक करणाऱ्या दोघांना दिघी पोलिसांनी अटक केली आहे. देहूफाटा चौकाकडून च-होलीफाटा चौकाकडे जाणाऱ्या रोडवर हि कारवाई करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींकडून 10 विदेशी मद्याचे बॉक्स आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.

सुरज बाबू कांबळे (वय 23, रा. धावडेवस्ती, भोसरी), सुरज संतोष मिसाळ (वय 24, रा. धावडेवस्ती, भोसरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलोसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूफाटा चौकाकडून च-होलीफाटा चौकाकडे जाणाऱ्या रोडवर दिघी पोलिसांनी एका संशयित कारला (एम एच 14 / एच डब्ल्यू 3097) अडवले. कारची तपासणी केली असता त्यामध्ये 10 विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले.

एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्यासाठा आढळून आल्याने पोलीसांनी कारमधील दोघांना ताब्यात घेतले. मद्याच्या बॉक्सबाबत चौकशी केली असता त्यांनी हे बॉक्स लॉकडाऊनच्या कालावधीत विक्री करण्यासाठी साठवून ठेवण्यासाठी नेले जात असल्याचे सांगितले.

पोलिसांनी दोघांकडून 72 हजारांचे विदेशी मद्याचे 10 बॉक्स, एक कार असा एकूण पाच लाख 22 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.