Dighi Crime News : भरधाव दुचाकीची जेसीबीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या दुचाकीने जेसीबीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी दिघी-आळंदी रोडवर वडमुखवाडी येथे घडला असून याबाबत चौकशीअंती 23 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यादव रामचंद्र बिराजदार (वय 29, रा. देहूगाव, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत यादव हा आळंदीकडून दिघीकडे दुचाकीवरून (एम एच 14 / एफ झेड 8978) भरधाव वेगात जात होता. वडमुखवाडी येथे रस्त्याने एक जेसीबी जात होता. यादव याने भरधाव वेगात दुचाकी चालवून जेसीबीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये यादव गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.