Dighi Crime News : खंडणी मागत क्लिनिकमध्ये तोडफोड

एमपीसी न्यूज – मी सराईत गुन्हेगार आहे, तुला माहित नाही का? म्हणत आत्ताच्या आत्ता 10 हजार रुपये दे, अशी धमकी देत एका गुंडाने दिघी (Dighi Crime News) रोडवरील पवार क्लिनिकमध्ये तोडफोड केली. तसेच डॉक्टरांना मारण्यासाठी धावून गेला. हा प्रकार मंगळवारी (दि. 3) रात्री घडला.

डॉ. रामदास शिवराम पवार (वय 53, रा. मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोपान निवृत्ती गवळी (वय 35, रा. भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Pimpri Crime News :महाळुंगे मध्ये कामगाराने केले सुपरवायझर वर कोयत्याने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. पवार यांचे दिघी रोडवर क्लिनिक आहे. ते मंगळवारी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या क्लिनिकमध्ये असताना आरोपी गवळी क्लिनिकमध्ये आला. क्लिनिकमधील रुग्णांना शिवीगाळ, दमदाटी करून दशहत माजवत डॉ. पवार यांना शिवीगाळ करून मला आत्ताच्या आत्ता दहा हजार रुपये दे, नाहीतर तुझे काही खरे नाही, अशी धमकी दिली. डॉ. पवार यांनी पैसे देण्यास नकार दिला (Dighi Crime News) असता आरोपीने क्लिनिकमधील सीझर घेऊन डॉ. पवार यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून आला. मी यापूर्वी हाफमर्डर केला आहे. माझ्यावर 326 पण दाखल आहे. तुला माहिती नाही का, अशी जीवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.